युपीएसी, एमपीएससी लाॅच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व शैक्षणिक वस्तूंचे वितरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

युपीएसी, एमपीएससी लाॅच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व शैक्षणिक वस्तूंचे वितरण

Share This

मुंबई-१५-(प्रतिनिधी)- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भीम आर्मी श्री रेणुका इन्स्टिट्यूट फाॅर रूरल डेव्हलपमेंट तसेच एक वही एक पेन अभियान यांच्या वतीने एमपीएससी युपीएसी लाॅ व विविध विषयांवर पीचडी करणारे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्य तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण वितरण करण्यात आले.
 
चेंबूर पूर्व हाॅटेल ग्रॅड सेंट्रल येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते किरण माने, भीम आर्मीचे अशोक कांबळे,सुनील गायकवाड,सुनील थोरात , अविनाश गायकवाड, एक वही एक पेन अभियानचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार राजू झनके, रेणुका इन्स्टिट्यूटचे प्रशांत ईटगीकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
महामानव व महापुरूषांना विशिष्ट जातीच्या चौकटीतून न पाहता त्यांच्या केल्यापासून प्रेरणा घेऊन लोकांनी देशातील जनतेच्या विकासासाठी काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सर्व महापुरूषांचा आदर्श घेऊन शिक्षणात अग्रेसर रहावे असे ज्येष्ठ सिने अभिनेते किरण माने यांनी यावेळी बोलताना सांगितले. एक वही एक पेन अभियानचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी अभियानाची भूमिका सांगताना सन -२०१५ मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिनी सुरू करण्यात आलेले एक वही एक पेन अभियानाचा आता वटवृक्ष झाला असून सर्वच महापुरूषांच्या जयंती दिनी व सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवातदेखील हे अभियान राज्यभरात विविध संस्था संघटना व मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
 
समाजातील गरजू होतकरू व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असून धर्मनिरपेक्ष व सशक्त भारत निर्माणासाठी भारतीय संविधानाच्या प्रचार आणि प्रसाराची आज खरी गरज आहे असे ते म्हणाले. भीम आर्मीचे सुनीलभाऊ गायकवाड व सुनील थोरात रेणुका इन्स्टिट्यूटचे प्रशांत यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले.

सदर प्रसंगी युपीएसी एमपीएससी लाॅ व विविध विषयांवर पीएचडी करणा-या १५ गरजू विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी १० हजार रुपयांचा चेक व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यांच्या सोबतच समाजातील चौथी ते १२ वीच्या गरजू विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास काटे यांनी केले.
 
सुशीलाताई कापूरे, सुरेश धाडी,नागेश कांबळे, गोपाळ गायकवाड,दिनेश शर्मा,प्रजित गायकवाड, सुबोध झनके , सुनील वाकोडे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा संविधान प्रास्तविका व शालेय देवून सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages