स्वतःला बाळासाहेब वाटून घेणे ही तर केमिकल लोच्याची केस - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2022

स्वतःला बाळासाहेब वाटून घेणे ही तर केमिकल लोच्याची केस - उद्धव ठाकरेमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सभेत जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा देखील घेतला आहे. त्यांच्या याच भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटाचा उल्लेख करत राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी चित्रपटातील अभिनेता संजय दत्तच्या डोक्यात केमिकल लोच्चा झालाय तशी राज ठाकरेंची गत झाल्याची टीका केली.

मला एका शिवसैनिकाने प्रश्न विचारला तुम्ही लगे रहो मुन्नाभाई चित्रपट पाहिलात का? मी म्हटले आता त्याचा संबंध काय? म्हणे त्याच्यात संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग हा गांधीगिरी करतो. तशी एक केस आपल्याकडे आहे. मी म्हटले कोणती? म्हणे ती नाही का, ज्याला स्वत: बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. हल्ली शाल घेऊन फिरतात. ते कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. पिक्चरमधील मुन्नाभाई लोकांचे भले तरी करत असतो. हा कुठला मुन्नाभाई काढला? मी म्हटलं, अरे त्यातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. कुणाला त्याच्या भ्रमात राहु द्याना. पण तुम्ही त्या चित्रपटाच्या शेवट नाही बघितला म्हणे. म्हटलं काय? शेवटी संजय दत्तला कळतं की साला अपून के भेजेमे केमिकल लोचा होयला है. तर ही केमिकल लोचाची केस आहे. सध्या सुरू असलेला चित्रपटही सत्य घटनेवर आधारित आहे. असे मुन्नाभाई फिरत असतात, फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचे आहे. जाऊ द्या, असे उद्धव ठाकरे यांनी राज यांना सुनावले.

भाजपवर टीका करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ता मिळत नाही म्हणून तुमचे एकतर्फी प्रेम चालले आहे. मग वाटते, हे कोणत्या दिशेने चालले? एकतर्फी प्रेमात प्रेयसीला विद्रूप करण्याचे प्रकार घडत असतात. तसे यांचे एकतर्फी प्रेम आहे. हे महाराष्ट्राला विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहेत. घशाची खाज खाजवायची कशी म्हणून हे बोलून मिटवतात. मात्र, आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही. एक तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. मात्र, अंगावर आले तर सोडत नाही हे आमचे हिंदुत्व आहे, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad