रेल्वेखाली उडी घेत मायलेकीची आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेखाली उडी घेत मायलेकीची आत्महत्या

Share This


नाशिक - नाशिक शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज तीन ते चार आत्महत्या उघडकीस येत आहेत. देवळाली कॅम्प येथील दोघा मायलेकींनी रेल्वे पुढे झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.देवळाली कॅम्प बार्नस्कूल जवळ राहणा-या अनिता शिरोळे व राखी शिरोळे या माय लेकीने रेल्वेखाली उडी घेत जीवन संपविले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवळाली कॅम्प येथील बार्नस्कूल जवळील मल्हारीबाबा येथे शिरोळे कुटुंब वास्तव्यास आहे. अनिता शिरोळे यांचे पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार म्हणून काम पाहतात. ते कामानिमित्त सोलापूर येथे गेले असल्याने या दोघीच मायलेकी घरी होत्या. या दोघीनी अचानकपणे घरापासून काही अंतरावर असलेल्या पाळदे मळा येथील मुंबईहून-नाशिकरोड कडे येणार रेलवेमार्ग गाठला.

दरम्यान डाऊन लाईनवरून नाशिककडे भरधाव येणा-या गीतांजली एक्सप्रेसपुढे दोघींनी स्वत:ला झोकूल दिले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. रविवारी सकाळच्या अकरा वाजेपूर्वीच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages