Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव नामांतरमुंबई : विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यासाठी काही तास उरलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय घेतानाच वैधानिक विकास मंडळांचे पुरुज्जीवन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. (aurangabad-is-now-renamed-as-sambhajinagar-osmanabad-as-dharashiv)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला २४ तासांत म्हणजेच गुरुवारी आपले बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. बहुमताच्या अग्निपरीक्षेला काही तास उरलेले असताना आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक कदाचित महाविकास आघाडी सरकारची शेवटची मंत्रिमंडळ ठरणार का, असे चित्र असताना सरकारने आज या बैठकीत अनेक प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. वैधानिक विकास मंडळे पुनर्जीवित करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठित करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom