
नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपने नूपूर शर्माचे प्राथमिक सदस्यत्त्व रद्द केले, तर नवीन जिंदाल यांचेदेखील सदस्यत्व रद्द केले. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर महामानवाबद्दल अपमानास्पद वक्तव्य गैर असल्याचे भाजपने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment