चिंता वाढली... मुंबईत कोरोनाचे ९६१ नवीन रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2022

चिंता वाढली... मुंबईत कोरोनाचे ९६१ नवीन रुग्ण


मुंबई - मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने चिंता वाढते आहे. सलग आठवडाभर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या फरकाने वाढते आहे. रविवारी दिवसभरात ९६१ कोरोनाचे ९६१ नवीन रुग्ण आढळले. यापैकी ४४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार बाधित रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मागील सलग आठवडाभऱ कोरोनाचा आलेख चढता राहिला आहे. यात सलग तीन दिवस रुग्णसंख्या ७०० च्य़ा वर गेली. शनिवारी या संख्येत वाढ होऊन रुग्णांची संख्या ८८९ वर गेली. रविवारी यात आणखी वाढ होऊन रुग्णसंख्या ९६१ वर गेली आहे. वाढत्या रुग्णांमुळे मुंबईकरांची चिंता वाढली असून गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सलग वाढणा-या रुग्णसंख्येमुळे पालिका अॅक्शनमोडमध्ये आली आहे. प्रसार वाढू नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येते आहे. मे अखेरपासून रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. शुक्रवारी ७६३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ही संख्या वाढून ८८९ वर गेली. तर रविवारी ही रुग्णसंख्या हजारच्या जवळपास गेली आहे.

दिवसभरात ३७४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ६९ हजार ८५८ झाली आहे. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतची मृतांची संख्या १९ हजार ५६९ झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४५ हजार ४०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२०४ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या ४,८८० सक्रिय रुग्ण आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad