महापालिका शाळांचा १३ वर्षानंतर गणवेश बदलणार ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2022

महापालिका शाळांचा १३ वर्षानंतर गणवेश बदलणार !


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा मेकओव्हर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन योजना आखल्या आहेत. त्यासाठी पालिकेच्या गेल्या काही अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. विद्यार्थी शाळेकडे प्रेरित होतील हा मुंबई महापालिकेच्या मिशन अॅडमिशनचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळांसोबतच येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचाही रंग बदलणार आहे. तब्बल १३ वर्षांनंतर गणवेशात बदल केला जाणार आहे. त्यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थी नव्या शैक्षणिक वर्षात नव्या गणवेशात पहायला मिळणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेने याआधी २००९ मध्ये महापालिका शाळांचा गणवेश बदलला होता. त्यानंतर १३ वर्ष गणवेश बदलण्यात आला नव्हता. सद्या शाळांचा मेकओव्हर केला जात असतानाच गणवेशचा रंगही बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मागील काही वर्षात मुंबई महापालिकेच्या पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात भक्कम तरतूद केली आहे. त्यामुळे शाळांकडे मुलांना प्रेरित करण्यासाठी आकर्षक अशी रंगसंगती दिली जात आहे. त्यानुसारच आता शाळांमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नवीन रंगाचा गणवेश उपलब्ध करून देण्याचा मुंबई महापालिकेचा मानस असल्याचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले. येत्या जुलै ऑगस्टमध्ये हा नवीन गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. शालेय २७ वस्तुंच्या वाटपामध्ये शाळेच्या गणवेशाचाही समावेश आहे. शालेय वस्तुंमध्ये प्राधान्याने गणवेशाची डिझाईन फायनल करण्यात आली आहे. या डिझाईनला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर लवकरच गणवेशाची निविदा प्रक्रिया निघून शाळांमध्ये हे गणवेश वितरणासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वापरासाठी उपलब्ध होतील, असेही कुंभार यांनी स्पष्ट केले.

असा असणार शाळेचा नवा गणवेश-
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थांसाठी २००९ मध्ये निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. यावेळी क्रीम रंगाची ट्राऊजर आणि चॉकलेटी रंगाचा शर्ट अशा रंगसंगतीचा गणवेश यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये काही विशिष्ट डिझाईन गणवेशासाठी निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या २७ शालेय वस्तुंमध्ये हा गणवेशही दिला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad