Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबईत कोरोना फोफावतोय - दिवसभरात १२४२ नवीन रुग्ण


मुंबई - मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोना झपाट्याने वाढतो आहे. सलग आठ - दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या फरकाने वाढते आहे. मंगळवारी दिवसभरात १२४२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. रविवारी ९६१ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कोरोना फोफावत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या शनिवारी रुग्णांची संख्या ८८९ वर गेली. रविवारी यात आणखी वाढ होऊन रुग्णसंख्या ९६१ पोहचली. सोमवारी ही संख्या काहीशी घटली होती. मात्र मंगळवारी रुग्णांची आकडेवारी थेट १२४२ वर गेली आहे. सलग वाढणा-या रुग्णसंख्येमुळे पालिकेची यंत्रणा अॅक्शनमोडमध्ये आली आहे. प्रसार वाढू नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येते आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे शून्य मृत्यूची नोंद होते आहे. दिवसभरात ५०६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ७१हजार ७७६ झाली आहे. तर दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंतची मृतांची संख्या १९ हजार ५६९ वर स्थिर राहिली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४६ हजार २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९८६ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या ५९७४ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom