सहमतीचे लैंगिक संबंध बलात्कार नव्हे - हायकोर्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2022

सहमतीचे लैंगिक संबंध बलात्कार नव्हे - हायकोर्ट



नवी दिल्ली - दोन प्रौढ व्यक्तींमध्ये जर सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असतील जे फसवणुकीच्या उद्देशाने किंवा खोटी माहिती देऊन झाले असतील तर कलम ३७६ अंतर्गत बलात्कार ठरु शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल केरळ हायकोर्टाने दिला. न्या. बी. के. थॉमस यांनी हे निरिक्षण नोंदवताना अ‍ॅड. नवनीत नाथ यांना जामीन मंजूर केला.

अ‍ॅड. नवनीत नाथ यांनी एका महिला वकिलाला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर आपल्या वचनाचा भंग करीत दुस-या महिलेशी लग्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावर फिर्यादी पक्षाने आरोप केला की, ज्यावेळी पीडितेला या संभाव्य लग्नाबद्दल कळले तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर अ‍ॅड. नाथ यांना कलम ३७६ (२)(ल्ल), कलम ३१३ अंतर्गत २३ जून रोजी अटक केली होती.

यावर कोर्टाने म्हटले की, जरी दोन इच्छुक जोडीदारांमधील लैंगिक संबंध विवाहात परावर्तीत होत नसले तरीही, लैंगिक संबंधाच्या संमतीसाठी कोणतेही घटक कारणीभूत नसतील ते बलात्काराचे प्रमाण ठरणार नाही. पण नंतर लग्नास नकार देणे किंवा नातेसंबंधाचे रुपांतर लग्नात होण्यास अपयश येणे हे घटक बलात्कारास पुरेसे ठरत नाहीत.

‘‘लग्नाच्या वचनाचे पालन न केल्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध बलात्कार तेव्हा ठरेल, जेव्हा वचन देणा-याला आपला शब्द पाळायचा नसेल आणि वचन देऊन त्याने स्त्रीला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले असेल. अशा प्रकारे शारीरिक मिलन आणि लग्नाचे वचन यांच्यात थेट संबंध असल्यासच तो बलात्कार ठरतो,’’ असेही कोर्टाने यावेळी टिपण्णी करताना म्हटले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad