Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठराव जिंकलामुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६४ मतांनी विश्वास ठराव जिंकला.

विश्वासमताच्या बाजूने १६४ मते पडली. तर विश्वास ठरावाच्या विरोधात ९९ मते पडली. तर कालच्या प्रमाणे आजही चार आमदार तटस्थ राहिले. कालच्यापेक्षा आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आघाडीला ८ मते कमी पडली. एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाच्या आणि भाजपच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांचं स्वागत केलं.

आज सकाळी ११ वाजता विधानसभेचं कामकाज सुरू झालं. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे-फडणवीस सरकारने जिंकल्यानंतर आजच्या विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर आवाजी मतदान घेतलं. नंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून मतदानास सुरुवात केली. यावेळी शिंदे गटाला १६४ मते पडली. तर विश्वासमताच्या विरोधात ९९ मते पडली. आजही एमआयएम आणि सपाचे मिळून चार सदस्य तटस्थ राहिले. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडून आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

आदित्य ठाकरे आवाजीला गैरहजर -
विधानसभेचं कामकाज बरोबर ११ वाजता सुरू झाले.त्यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे सभागृहात हजर नव्हते. आदित्य ठाकरे उशिरा सभागृहात पोहोचले. तोपर्यंत आवाजी मतदान झालं होतं. विधानभेचे दरवाजे बंद होत असतानाच ठाकरे सभागृहात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom