मुंबई - मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. रोज पाचशेच्या आत रुग्णांची नोंद होते आहे. रविवारी दिवसभरात २७६ नवीन रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. घटणा-या कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर मे महिन्यांच्या अखेरला रुग्ण पुन्हा वाढू लागले. दिवसभरात दोन हजारावर रुग्ण वाढले. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासमोर पुन्हा आव्हान उभे राहिले. मात्र पालिका व राज्य सरकारच्या प्रभावी उपाययोजना, नियमांची कडक अंमलबजावणी, उपचार पद्धती आदी उपाययोजनांमुळे चौथी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले. मागील महिनाभरात कोरोना स्थिती सुधारली आहे. सध्या पाचशेच्या आत रुग्णांची नोंद होते आहे. रविवारी दिवसभरात २७६ नवीन रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १९,६३२ रुग्णांचा मृत्यू झाला. बरे होणा-या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. दिवसभरात ३९७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १० लाख ९९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्केवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २२७९ दिवसांवर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
No comments:
Post a Comment