मुंबईत दुस-या दिवशीही पावसाचा जोर कायम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2022

मुंबईत दुस-या दिवशीही पावसाचा जोर कायम



मुंबई - मुंबई व उपनगरांत सलग बुधवारी दुस-यादिवशीही पावसाने संततधार ठेवत जोरदार बरसला. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले. रस्ते व रेल्वेवाहतुकीचा वेगही मंदावला. चुनाभट्टी- सायन येथील दरडीचा काही भाग येथील चाळीतील घरांवर कोसळल्याने तीन जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. हवामान विभागाने मुंबईत पावसाचा यलो अॅलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सखल भागात पाणी साचणा-या ठिकाणी पाण्याचा निचरा करणा-या पंपांची व्यवस्था करण्यात आल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. दरम्यान येत्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईत मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. मंगळवारी पावसाने दिवसभर संततधार ठेवल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. मिलन सबवे, अंधेरी सबवे, दादर टीटी, गांधी मार्केट, चेंबूर शेल कॉलनी, कुर्ला, अंधेरी, वांद्रे, वडाळा आदी सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक जाम झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामावर जाणा-या नोकरदारांना कामावार जाण्यास उशिर झाला. गेल्या काही दिवसांपासून पडणा-या पावसांत अंधेरी सबवे, मिलन सबवे येथे पाणी साचण्याची कायम राहिली आहे. त्यामुळे येथील वाहतुक वळवावी लागली. सलग दोन दिवस पाऊस संततधार कोसळत असल्याने मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. असले तरी मुंबई ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून दरवर्षीप्रमाणे मुंबईकरांमध्ये फारसा संताप व्यक्त केल्याचे ऐकण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनीही पालिकेच्या कामाचे कौतुक केल्याने राजकीय पक्षांकडून पाणी साचणे किंवा खड्डयांवरून जाहिरपणे राजकारण झाल्याचे दिसले नाही.

गेल्या चार दिवसांत ५०० मीमीहून अधिक पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केल्याने मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. चौपाट्या, समुद्र किना-यावर लाईफ गार्ड, सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. आवश्यक भासल्यास एनडीआरएफची टीमही सज्ज ठेवण्यात आली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

पडझडीच्या घटनांचे सत्र सुरुच -
मुंबईत पहिल्याच पावसांत वांद्रे येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झासा. त्यानंतर काही दिवसांतच कुर्ला येथे तीन मजली इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. मागील चार पाच दिवसांपासून सलग कोसळणा-या पावसांतही घरावर झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. बुधवारी चुनाभट्टी येथे चाळीवर दरड कोसळून तीन जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे आतापर्यंतच्या पावसांच सतत पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे.

येथे पाणी साचले -
मिलन सबवे, अंधेरी सबवे, दादर टीटी, गांधी मार्केट, चेंबूर शेल कॉलनी, कुर्ला, अंधेरी, वांद्रे, वडाळा, चुनाभट्टी, सायन आदी ठिकाणी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad