'माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2022

'माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका - उद्धव ठाकरे


मुंबई - 'माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका' असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका असेही ते म्हणाले. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे झालचं नसते असेही ठाकरे म्हणाले.

राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. अमित शाह आणि माझं जे ठरलं होत ते झालं असते तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. सगळं सन्मानानं झाले असते. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जे भाजपसोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असेही ते म्हणाले. 

आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. ठरल्याप्रमाणं झालं असते तर भाजपचा अडीच वर्ष मुख्यमंत्री झाला असता. आता भाजपला काय मिळाले, भाजपच्या मतदारांना काय आनंद मिळाला, यातून जनतेला काय मिळणार हे लवकरत कळेल असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसात मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियातून अनेकांच्या सदिच्छा आल्या. माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी असल्याचे ठाकरे म्हणाले. माझं पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे अश्रू माझी ताकद आहे. सत्ता येवो सत्ता जावो या ताकदीशी मी कदीही प्रतारणा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आपण ज्याला मतदान करतो त्याला परत बोलावण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला असला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. माझ्या पाठीवर कसा खंजीर खुपसला हे सर्वांनी पाहिले. मतदारांनी ज्यांना निवडून दिले तेच मुंबई, सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा असे फिरत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कुठे आहे लोकशाही? लोकशाहीचे चार स्तंभ. लोकशाही वाचविण्यासाठी हे चार स्तंभ आता पुढे यायला हवे. लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. पुढे या. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल." अशी चिंता देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

"माझा राग मुंबईकरांवर काढू नये. मेट्रो शेडच्या प्रस्तावात बदल करू नका. मुंबईच्या वातावरणाशी खेळू नका. आम्ही कंजूर मार्गचा पर्याय सुचवलेला आहे तोच पुढे चालू ठेवा. आता तर केंद्रात आणि राज्यात देखील तुमचंच सरकार आहे." मेट्रो शेड प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनीही आपले मत मांडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad