लम्पी विषाणू - ३,२२६ गोजातीय जनावरांचे होणार लसीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2022

लम्पी विषाणू - ३,२२६ गोजातीय जनावरांचे होणार लसीकरणमुंबई - लम्पी या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. सन २०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. लम्पी विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३,२२६ गोजातीय जनावरांचे लसीकरण आठवडाभरात पूर्ण केले जाणार आहे. या जनावरांचे सर्वेक्षणही सुरु करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख व देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

लम्पी विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असलेला चमू गठीत केला आहे. या चमुद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तबेले व गोशाळा यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागास गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात आणि कीटक नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय जनावरे व २४,३८८ म्हैसवर्गीय जनावरे असून, प्राधान्याने ३,२२६ गोजातीय जनावरांचे लसीकरण या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याशी ०२२-२५५६-३२८४, ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महापालिकेने आवाहन केले आहे.

पालिकेची नियमावली -
गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात; त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास बंदी असणार आहे. गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य, प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेऊ नये. गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad