गेट वे ऑफ इंडियाचा चेहरा मोहरा बदलणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2022

गेट वे ऑफ इंडियाचा चेहरा मोहरा बदलणार


मुंबई  -  पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथील रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई, पदपथांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यामुळे गेटवेचा चेहरा मोहरा बदलणार आहे. यासाठी मुंबई महापालिका (Bmc, Mcgm) १६ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल ठोंबरे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचा नुकताच आढावा घेतला. यानंतर मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे निर्देश शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले. त्यानंतर मुंबईचे डिसेंबर अखेरपर्यंत ५० टक्के तर मार्च २०२३ पर्यंत ५० टक्के सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथून सौंदयीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यात पदपथाचे सौंदर्यीकरण, रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई, आकर्षक झाडांची लागवड केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण, पवई तलाव येथे लेझर शो, उड्डाणपूलाची रंगरंगोटी, विभाग कार्यालयातील १५ किलोमीटरचे रस्ते विद्युत रोषणाईने उजळणार आहे. पालिकेने अँक्शन प्लॅन तयार केला असून मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी तब्बल १७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad