टिळक नगर येथील रेल व्हीव इमारतीला आग, ३३ लोकांची सुखरूप सुटका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 October 2022

टिळक नगर येथील रेल व्हीव इमारतीला आग, ३३ लोकांची सुखरूप सुटका

 

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ असलेल्या रेल व्हीव या १२ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ बचावकार्य सुरु केले. इमारतीत अडकलेल्या ३३ रहिवाशांना बाहेर सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. आगीवर सव्वादोन तासानंतर नियंत्रण आले. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ रेल व्हीव १२ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील एका घरात आग लागली. आगीची माहिती मिळताच दोन फायर इंजिन आणि १ जंबो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होऊन दलाने बचावकार्य सुरु केले. १२ मजल्यावर लागलेली आग क्षणात भडकत गेल्याने आगीचा धूर ११ व्या मजल्यापर्यंत परसत गेला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी पावणे तीन वाजता लेव्हल १ ची आग घोषित करण्यात आली. आग लागल्याची माहिती समजताच रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. तर इमारतीतील चार रहिवासी जीव वाचवण्यासाठी बाहेर सज्जा जवळ येऊन थांबले. तर धूर पसरल्यामुळे काहींना बाहेर पडता न आल्याने घरातच अडकले. या रहिवाशांची सुटका करण्याचे आणि आग विजविण्याचे काम अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अखेर अडकलेल्या सर्व ३३ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात दलाला यश आले. दरम्यान आगीची तीव्रता आणि धूर पसरत गेल्याने अग्निशमन दलाकडून आगीची लेव्हल २ ची घोषणा करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी ८ फायर इंजिन आणि ५ जम्बो वॉटर टँकर दाखल झाले. सव्वादोन तासानंतर म्हणजे पावणे पाच वाजताच्या दरम्यान दलाला आग विजवण्यात यश आले. आगीत कोणीही जखमी झालेले नाही. आग कशामुळे लागली याचा अधिक तपास सुरु असल्याचे दलाकडून सांगण्यात आले. दरम्यान आगीची माहिती मिळताच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अनिल कोकीळ, प्रविणा मोरजकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad