७ ते २० नोव्हेंबरपर्यंत भारत जोडो यात्रा महाराष्‍ट्रात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2022

७ ते २० नोव्हेंबरपर्यंत भारत जोडो यात्रा महाराष्‍ट्रातमुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्‍वाखालील भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्‍ट्रात येत आहे. ७ ते २० नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा महाराष्‍ट्रात होणार असून, ही एक ऐतिहासिक पदयात्रा असून केवळ काँग्रेस पक्षाची यात्रा नसून समविचारी पक्षाचे लोक, संघटना यांचाही सहभाग वाढत आहे. लोकशाहीला मानणाऱ्या प्रत्येकाचा या पदयात्रेला पाठिंबा आहे. ही पदयात्रा महाराष्ट्रात ७ तारखेला प्रवेश करत असून, मोठ्या संख्येने सहभागी होऊन पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन काँग्रेस नेत्‍यांनी केले आहे.

दरम्‍यान, काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून, एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाखाली काँग्रेस पक्ष देशात पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदनाचा ठराव नाना पटोले यांनी मांडला. या ठरावाला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमोदन दिले. या बैठकीत बोलताना पाटील यांनी खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूतपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन अध्यक्षपदी निवड झाली. एक कामगार कुटुंबातील व्यक्ती देशातील सर्वात जुन्या पक्षाचा अध्यक्ष होतो ही ऐतिहासिक घटना आहे. काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे.

तर खर्गे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे. ५० वर्षांचा ससंदीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव खर्गे यांना आहे. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. काँग्रेस पक्षाचा ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad