बेस्ट प्रवाशांचा लवकरच लक्झरी प्रवास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट प्रवाशांचा लवकरच लक्झरी प्रवास

Share This


मुंबई - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चार प्रिमियम बसेस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होत असून, आरटीओच्या परवानगीनंतर प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील. त्यामुळे लक्झरी बसने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे घरातून मोबाइल अॅपवर तिकीट बुकिंग केल्यावर संबंधित प्रवाशांची सिट्स आरक्षित राहणार आहे. एकूण दोन हजार लक्झरी बस दाखल होणार असून, त्यापैकी ४ बस ८ ते १० दिवसांत येणार आहेत, तर टप्प्याटप्प्याने उर्वरित लक्झरी बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील, असा विश्वास बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित इलेक्िट्रक बसेसचा समावेश करण्यावर भर दिला आहे. वातानुकूलित इलेक्िट्रक बसमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार होणार आहे. तसेच इलेक्िट्रक बसेस पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. साधारण इलेक्िट्रक बस, वातानुकूलित इलेक्िट्रक बस, ओला, उबरप्रमाणे कॅब प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. प्रिमियम बस दाखल होणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ४ प्रिमियम बस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील. वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्याबाबत प्रक्रिया सुरू असून, लवकरच प्रवाशांना लक्झरी प्रवास करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन हजार लक्झरी बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या सगळ्या बसेस वातानुकूलित असून बसमध्ये तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी खास अॅप तयार करण्यात येत असून, सिट्स बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच बस कुठपर्यंत आली, बसमध्ये किती गर्दी आहे, याची सविस्तर माहिती अॅपवर मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages