‘बेस्ट’ने जाहीर केली गहाळ झालेल्या फोनची यादी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2022

‘बेस्ट’ने जाहीर केली गहाळ झालेल्या फोनची यादीमुंबई - अनेकदा घाईगडबडीत आपला फोन गहाळ होतो किंवा हरवतो अशावेळी मात्र शोधाशोध करत हतबल होऊन अनेकजण पोलीस स्टेशनला तक्रार करतात. बेस्ट बसमध्ये ज्यांचे फोन ऑक्टोबर २०२२ या महिन्यात गहाळ झाले आहेत, अशा फोनची यादी बेस्ट उपक्रमाने जाहिर केली आहे. त्यामुळे अशा सर्व नागरिकांना बेस्टने दिलासा दिला आहे.

बेस्ट उपक्रमाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून गहाळ किंवा बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मोबाईल फोन हरवलेला दिनांक, बस क्रमांकाचा मार्ग, मोबाईल फोनचे नाव नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्यांचे फोन हरवले आहेत त्यांनी तातडीने बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधावा आणि मोबाईल फोन १५ डिसेंबर २०२२ च्या आधी आपल्या ताब्यात घ्यावेत असे आवाहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे. गहाळ वस्तूंची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या bestundertaking.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे बेस्टने स्पष्ट केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad