
मुंबई - कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांत लोकलमध्ये सामान्य प्रवाशांना प्रतिबंध असल्यामुळे मुंबईत रेल्वे प्रवासादरम्यान महिलांसंबंधित गुन्ह्यांमध्ये घट झाली होती. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर मात्र लोकलमध्ये पूर्वीसारखीच गर्दी होऊ लागली असून यंदाच्या वर्षी प्रवासादरम्यान विनयभंगाच्या गुन्ह्यांचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या विनयभंगाची ६२ प्रकरणे नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे ९० टक्के आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
No comments:
Post a Comment