मुंबई महानगरपालिका निवडणूक संपुर्ण ताकदीने लढवणार - प्रीती शर्मा मेनन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2022

मुंबई महानगरपालिका निवडणूक संपुर्ण ताकदीने लढवणार - प्रीती शर्मा मेनन


मुंबई - पक्षाने एक मोठी भरारी घेतली आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीचे निकष पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीला दिल्लीपुरता मर्यादित असलेला आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) हा प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय पक्ष झाला असून गुजरातच्या (Gujrat Elections) लोकांचे मी आभार मानते. ज्यांच्या मतांमुळे आप राष्ट्रीय पक्ष बनला आहे. आम आदमी प्रत्येक राज्यात आम आदमी पार्टी वर विश्वास ठेवत आहे याची प्रचिती निवडणुकांच्या (Elections) निकालावरून सिद्ध होतं आहे, असा विश्वास प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि एचएम अमित शहा Amit Shah) यांचे गृहराज्य आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यात आम आदमी पक्षाने १४ टक्के पेक्षा जास्त मतांचा वाटा मिळवून आपली छाप पाडली आहे. गुजरातच्या लोकांचे प्रेम आणि समर्थन यासाठी आम्ही सदैव ऋणी आहोत.  आम आदमी पार्टीचे यश खरोखरच ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. भारतातील इतर कोणताही राजकीय पक्ष आपल्या मूळ प्रदेशातून बाहेर पडला नाही आणि इतर राज्यांमध्ये निवडणुका जिंकला नाही. पण आम आदमी पार्टीने हे करून दाखवलं असे मत प्रीती शर्मा यांनी व्यक्त केले. 

द्वेषाचे आणि फुटीरतेचे राजकारण वाढत असताना, आम आदमी पार्टी स्वच्छ राजकारण आणि लोककेंद्रित सुशासनाचे मॉडेल भारतातील जनतेसाठी आशेचा किरण आहे. आगामी पालिका निवडणूक लढण्यासाठी सर्व ताकदीनिशी (Aap Ready For bmc Elections) तयार आहोत. जनता आमच्या सोबत आहे, प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad