गुजरातमधून आणलेले सिंह आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गुजरातमधून आणलेले सिंह आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडणार

Share This

मुंबई - गुजरात मधून आणलेली सिंहांची जोडी आज मंगळवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहेत. (Gujrat Lion's in Sanjay Gandhi National park) 

ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून (Sukker bagh zoo) मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता त्यांना मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. हे सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे. 

ही सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल तसेच या सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. 

भारतीय स्टेट बँकेने (State Bank Of India) हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेण्याची सूचना बँकेला केली होती. ती तातडीने बँकेने स्वीकारल्या बद्दल वनमंत्र्यांनी बँकेचे कौतुक करत आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages