झारखंड हत्याकांड - पतीने केले आदिवासी पत्नीच्या मृतदेहाचे 50 तुकडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2022

झारखंड हत्याकांड - पतीने केले आदिवासी पत्नीच्या मृतदेहाचे 50 तुकडे


मुंबई / झारखंड - राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील श्रद्धा वालकर (Shrddha Walavalkar) हीचे 35 तुकडे करून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. मात्र त्यापेक्षा भयानक हत्याकांड झारखंडमध्ये (Jharkhand Murder case) समोर आले आहे. आरोपी पतीने आपल्या आदिवासी पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेहाचे तब्बल 50 तुकडे केले. (Husband cut his wife's body into 50 pieces) पोलीस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. रिबीका पहाडीन असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून 25 वर्षीय दिलदार अन्सारी असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

महिनाभरापूर्वी लग्न - 
विशेष म्हणजे दोघांचे महिन्यापूर्वी लग्न झाले होते. दिलदारचे हे दुसरे लग्न होते. दिलदारची पत्नी देखील या जोडप्यासोबत राहायची. पहिल्या पत्नीचा या लग्नाला विरोध होता. याच विरोधातून घरामध्ये वारंवार भांडणे व्हायची. अखेर दिलदारने हा वाद कायमचा संपवण्यासाठी रिबिकाची हत्या करण्याचा प्लॅन आखला. मात्र त्याने केलेले कृत्य सर्वांच्याच अंगावर काटा उभा करत आहे. रीबिकाच्य मृतदेहाची तुकडे करण्यासाठी आरोपी दिलदारने इलेक्ट्रिक कटरचा वापर केला. आरोपीने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकले होते. काही तुकडे घरामध्ये लपवले होते, तर काही तुकडे परिसरातील निर्जन ठिकाणी फेकले होते. कुत्र्यांकडून ते तुकडे खाल्ले जात होते हे परिसरातील लोकांनी पाहताच हत्येचा संशय आणखी बळावला. पोलीस तपासामध्ये आतापर्यंत 18 तुकडे जप्त करण्यात आले आहेत. अद्याप रीबिकाच्या डोक्याचा पत्ता लागलेला नाही. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून आरोपी दिलदारला अटक करण्यात आली आहे.

आदिवासी समुदायातील रुबिका - 
हत्या करण्यात आलेली रीबिका ही आदिवासी समाजातील होती. ती साहेबगंज परिसरातील डोंगराळ भागात असलेल्या डोडा लोकवस्तीत राहायची. आधीच विवाहित असलेल्या दिलदारसोबत तिने महिनाभरापूर्वीच लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला दोन्ही घरांकडून विरोध होता. रिबीका तिच्या सहा भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मुलगी होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad