Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबई महापालिकेत अनागोंदी कारभार, श्वेत पत्रिका काढण्याची मागणी


मुंबई - पारदर्शकता व उत्तरदायित्वाचा अभाव, मनमानी पद्धतीने केल्या जाणा-या बदल्या तसेच आर्थि गैरव्यवस्थापन आणि वित्तीय बेशिस्तीमुळे मुंबई महानगराचे नागरी प्रशासन व कारभार कोलमडल्याची स्थिती आहे, असल्याचा आरोप पालिकेतील माजी नगरसेवकांनी केला आहे. मुंबई महापालिकेतील अनागोंदी कारभाराबाबत माजी ९४ नगरसेवकांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. याबाबत श्वेत पत्रिका काढा अशी मागणीही केली असल्याची माहिती पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात येवून राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर प्रशासकाच नियुक्ती करण्यात आली आहे, या गोष्टीला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रि निवडणूक होईपर्यंत महानगरपालिकेचे प्रशासक दुहेरी कार्यभार सांभाळत एक वर्ष पूर्ण करील. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक आणि समृद्ध वारसा व इतिहास असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या कारभारावरुन आम्ही व्यथित झालो आहोत. फक्त भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील ही एक नामांकीत संस्था आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दर्जा खालावत असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा या विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पारदर्शकतेचा उत्तरदायित्वाचा अभाव, मनमानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या बदल्या तसेच आर्थिक गैरव्यवस्थापन त्यामुळे मुंबई महानगराचे नागरी प्रशासन व कारभार कोलमडला आहे. मार्च २०२२ पासून अधिका-यांचे मनोधेर्ये खच्चीकरण होणे आदी कारणे यामागे असून या सर्व बाबी आपल्या निदर्शनास आणून देत असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे.

मार्च २०१२ मध्ये जेव्हा नगरसेवकाचा कार्यकाळ संपुष्टात आला, तेव्हापासून महानगरपालिका आयुक्त महानगरपालिकेचे प्रशासक या नात्याने कार्यभार पाहत आहेत आणि पारदर्शकता व उत्तरदायित्वाचा संपूर्ण अभाव निर्माण झाला आहे. हजारो कोटी रुपयांची कंत्राटे आणि प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, मात्र त्याबाबतचे एकही मसुदापत्र सार्वजनिकरित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले नाहीत. वित्तीय प्रकरणांचा विचार करता संपूर्ण कारभार झाकून ठेवण्यात आला आहे. विविध पक्षातील माजी नगरसेवकांनी सातत्याने विनंती करूनही त्यांना मसुदापत्र पुरवण्यात आलेले नाही. परिणामी कोण प्रकल्प राबविण्यात येत आहेत, कोणते कंत्राट आणि किती किंमतीला देण्यात आले आहेत, हे कळण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. महापालिकेतील या कारभाराबाबत पत्रात नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांची तात्काळ दखल घ्याल अशी अपेक्षाही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom