अंधेरीत ड्रग्स विक्रेत्याला अटक; 2.85 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंधेरीत ड्रग्स विक्रेत्याला अटक; 2.85 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त

Share This

मुंबई - अंधेरी येथील डी.एन.नगर पोलिसांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता एक 19 वर्षीय ड्रग्स विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 2.85 लाख रुपये किमतीचे ड्रग्स देखील जप्त करण्यात आले असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे. (Drug dealers arrested in Andheri)

अंधेरी पश्चिमेकडील कामा रोड परिसरात एक ड्रग्स विक्रेता ड्रग्स विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त बातमी द्वाराकडून पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अंधेरी स्टेशन परिसरातील कामा रोड परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून 50 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.आरोपीने ड्रग्स कुठून आणले आणि तो कुणाला देणार होता याविषयीचा तपास आता डी एन नगर पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages