कोरियन युट्यूबर महिलेची छेड काढणाऱ्या २ तरुणांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2022

कोरियन युट्यूबर महिलेची छेड काढणाऱ्या २ तरुणांना अटक


मुंबई - मुंबईतील खार भागामध्ये एक दक्षिण कोरियामधून आलेली युट्यूबर तरुणी लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. (Molesting Korean woman YouTuber) यावेळी २ तरुणांनी तिचा विनयभंग केला. हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यानंतर खार पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची दखल घेऊन कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या संदर्भात गुरुवारी पहाटे खार पोलिसांनी १९ वर्षीय चांद मोहम्मद आणि २० वर्षीय मोहम्मद नकीब अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही २९ नोव्हेंबरला घडली आहे. दक्षिण कोरियातुन आलेली ही तरुणी मुंबई फिरण्यासाठी खार परिसरामध्ये आली होती. लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना या २ तरुणांपैकी एका तरुणाने तिला स्वतःकडे खेचून जबरदस्ती करण्याचा आणि तिच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तरुणीने त्याला दूर केले. हे सर्व प्रकरण तिच्या एका फॉलोअरने ट्विट केले आणि मुंबई पोलिसांना टॅग केले. यानंतर खार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. परंतु, यानंतर पुन्हा एकदा विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासर्व प्रकरणाचा सोशल मीडियावर जोरदार निषेध केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad