महाविकास आघाडी तर्फे निघणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2022

महाविकास आघाडी तर्फे निघणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारीमुंबई - 17 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिजामाता उद्यान (राणीचा बाग) भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पर्यंत होत असलेल्या महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद तसेच राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचार शिंदे सरकारच्या विरूद्ध महाविकास आघाडी शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष व इतर घटक पक्ष यांच्यातर्फे संयुक्त मोर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.

मोर्चाची पूर्व तयारी करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान, माजी मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मधु चव्हाण, हेमंत टकले, आमदार रईस शेख यांच्यासह शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर घटक दलाच्या नेत्यांनी पाहणी दौरा केला व आढावा घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad