मुंबई महापालिकेत स्टेनो पदासाठी भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 January 2023

मुंबई महापालिकेत स्टेनो पदासाठी भरती


मुंबई - मुंबई महापालिकेच्या सचिव (चिटणीस) विभागातील रिक्त झालेल्या कनिष्ठ लघुलेखक-नि- वृत्तनिवेदक (स्टेनो)या पदांच्या २७ रिक्त जागांसाठी परीक्षा जाहीर झाली असून या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी होणाऱ्या परीक्षेमध्ये मराठीच्या १८ जागा आणि इंग्रजीच्या नऊ जागांचा समावेश आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ फेब्रुवारी २०२३ आहे. (Bmc steno vaccancy)

उमेदवाराची अर्हता -
उमेदवार १८ जानेवारी २०२३पर्यंत
खुल्या प्रवर्गातील उमेदवार१८ ते ३८ वर्षाचा, मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षाचा असावा. माध्यमिक शालांत परीक्षा किंवा त्यासंबधातील परीक्षा उत्तीर्ण असावा. महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक शिक्षण मंडळाचा एमएससीआयटी परीक्षा प्रमाणपत्रधारक उमेदवार असावा. इंग्रजी टंक लेखन ४० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन ८० शब्द प्रति मिनिट, मराठी टंक लेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन ८० शब्द प्रति मिनिट असावे.

अर्ज करण्याचा पत्ता :
महापालिका सचिव कार्यालय, खोली क्रमांक १००, पहिला मजला, विस्तारीत इमारत, महापालिका मार्ग, मुंबई ४०० ००१ या पत्यावर गुरुवार दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रतीसह टपालाद्वारे पाठवावेत किंवा व्यक्तीश: कार्यालयात आणून द्यावेत. अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

आरक्षण -
कनिष्ठ लघुलेखक-नि- वृत्तनिवेदक (इंग्रजी) : ०९ पदे

(अजा १, अज १, विजा १, इमाव ०२, आर्थिक दुर्बल घटक १ आणि खुला ०३)

कनिष्ठ लघुलेखक-नि- वृत्तनिवेदक (मराठी) : १८ पदे

(अजा १, अज २, विजा १, भज (क)१, भज(ड) १, इमाव ०५, आर्थिक दुर्बल घटक ३ आणि खुला ०४)

महिलांसाठी ३० टक्के आरक्षण

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad