मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारीत परिवहन भत्ता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारीत परिवहन भत्ता

Share This

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२२ पासूनचा सुधारीत परिवहन भत्ता थकबाकीसह मिळणार आहे. राज्य शासनाच्या परिवहन भत्त्याबाबतच्या वेळोवेळी देण्यात आलेल्या सुधारीत आदेशानुसार हा भत्ता मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. कर्मचा-यांना याआधीच्या करारानुसार थकबाकी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुधारित प्रवास भत्ता १ जानेवारी २०२२ पासून देण्यात यावा म्हणून समन्वय समितीच्यावतीने अॅड. प्रकाश देवदास यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीवर निर्णय देण्यासाठी रामनाथ झा समिती कडे पाठविण्यासाठी कळविले होते. सदर प्रश्न १९ सप्टेंबर २०११ रोजी समन्वय समिती समोर झालेल्या करारा प्रमाणे ज्यावेळी प्रवास भत्ता राज्या शासन सुधारणा करेल त्या प्रमाणे मुंबई पालिकेच्या कर्मचा-यांना लागू होईल याकडे देवदास यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे १९ सप्टेंबर २०११ मध्ये झालेल्या कराराप्रमाणे १ जानेवारी २०२२ पासून थकबाकीसह प्रवास भत्ता मिळणार आहे. या भत्त्याचा फायदा हा एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांना थकबाकीसह वाहतूक भत्त्याच्या स्वरूपात मिळणार आहे .त्यामुळे एप्रिल २०२२ पासूनचा दहा महिन्यांचा थकबाकीसह भत्ता कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येईल, असे संघटनेचे प्रकाश देवदास यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages