नाशिकमध्ये जिंदाल कंपनीत स्फोट, २ जणांचा मृत्यू, १७ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०१ जानेवारी २०२३

नाशिकमध्ये जिंदाल कंपनीत स्फोट, २ जणांचा मृत्यू, १७ जखमी



नाशिक - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या इगतपुरी मुंडेगावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर आग लागली आहे. या आगीत २ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी आहेत. या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.   

इगतपुरी मुंडेगावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला. पॉलिफिल्मची निर्मिती करणा-या जिंदाल ग्रुपच्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटामुळे आग लागली. या आगीमध्ये काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही कर्मचारी हे आत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीचे लोळ दूरवर दिसत होते. नाशिक ग्रामीण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंपनीत २५ ते ३० कामगार, कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ३ गंभीर जखमी कामगारांना, रेस्क्यू टीमने बाहेर काढले आहे. नाशिकच्या, जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० बेडचा आणि इगतपुरीच्या एसएमबीटी मेडिकल कॉलेजमध्ये विशेष कक्ष तयार केला आहे. जिल्हाधिका-यांसह, सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीची भीषणता अजूनही दाहक आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी, घोटी टोल नाका, इगतपुरी, त्रंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक येथून अग्निशमन दल आणि पंप घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग अजूनही आटोक्यात नसल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. घटनास्थळी ७ रुग्णवाहिका दाखल आहेत.

बचावकार्यात मोठ्या अडचणी - 
आग लागलेल्या शाफ्टजवळ अवघ्या १५० मीटर अंतरावर मोठा इंधन टँक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास २० हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्याने अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्याने, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS