मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौ-यादरम्यान ते बीकेसी येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच सभा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या दौ-यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याची नोंद मुंबईकर नागरिकांनी घेवून आपला प्रवास करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Traffic change in Mumbai)
नरेंद्र मोदींच्या दौ-यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मोदी यांच्या दौ-यानिमित्त बीकेसी आणि गुंडवली रेल्वे स्थानक बंद राहणार आहे. तर 4:15 ते 5:30 वाजता या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी तसेच 5:30 ते 5:45 या वेळेत उत्तरवाहिनी वाहतूक संथ गतीने सुरु राहणार आहे. पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सीलिंककडून बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणा-या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी राहणार आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे विविध माध्यामांतून वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ट्वीटरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
मेट्रो १ सेवा बंद -
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. यावेळी मेट्रो 2 ए आणि 7 या दोन लाईनचे लोकार्पण केले जाणार आहे. या वेळी पंतप्रधान मोदी मेट्रो ने प्रवास करणार आहेत. यामुळे आज सायंकाळी ५.४५ वाजल्यापासून रात्री ७.३० वाजेपर्यंत अंधेरी ते घाटकोपर मेट्रो १ सेवा बंद राहणार आहे.
No comments:
Post a Comment