मुंबई महापालिका शिंदे गटाची पक्षीय जबाबदारी सात जणांकडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2023

मुंबई महापालिका शिंदे गटाची पक्षीय जबाबदारी सात जणांकडे


मुंबई - मुंबई महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ पासून झालेली नाही. कोविड, ओबीसी आरक्षण, २३६ की २२७ प्रभाग यावरून न्यायालयात खटले सुरू असल्याने अद्याप निवडणूक झाली नाही. प्रभाग किती असावेत या संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या दरम्यान शिंदे गटाने मुंबई महानगर पालिकेतील पक्षाची जबाबदारी सात जणांकडे सोपविल्याचे जाहीर केल्याने निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्राची संघटनात्माक कार्याची जबाबदारी १) गजानन किर्तीकर - खासदार व नेते २) दिपक केसरकर - मुंबई शहर पालकमंत्री ३) राहुल शेवाळे - खासदार व उपनेते ४) यशवंत जाधव - उपनेते ५) शीतल म्हात्रे – उपनेत्या व प्रवक्त्या ६) आशा मामिडी - उपनेत्या ७) कामिनी राहुल शेवाळे - माजी नगरसेविका या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad