मुंबई महापालिकेचा मागील वर्षीचा अर्थसंकल्प ४० हजार कोटीचा सादर करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली असून महानगरपालिका सद्यस्थितीत अस्तित्वात नसून निवडणूक लांबली आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये कोणीही लोकप्रतिनिधी नसल्याने सन २०२३ - २४ चा अर्थसंकल्प हा केवळ प्रशासनाच्यास्तरावर सादर केला जाणार आहे. सद्यस्थितीत पालिकेत कोणीही लोकप्रतिनिधी नसल्याने विविध विभागातील कामांचे नागरीकांकडुन अभिप्राय व सूचना घेऊन अर्थसंकल्प बनविणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेसचे माजी गटनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. पालिकेनेही ही मागणी विचारात घेऊन अर्थसंकल्पात लोकसहभागासाठी पुढाकार घेतला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नागरिकांच्या सूचनांचा समावेश करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर २८ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment