पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी केला मुलीवर अत्याचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 January 2023

पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी केला मुलीवर अत्याचार


डोंबिवली - कल्याण आणि डोंबिवली शहरात गेल्या दोन वर्षात अत्याचारांचा घटनांमध्ये वाढ होत आहे. डोंबिवली आणि कल्याण ही दोन्ही शहरे यापुर्वी सामूहिक अत्याचाराच्या घटनेने हादरली होती. आता पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष बाब म्हणजे पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. (raped the girl pretending to be policemen)

बारावीमध्ये शिकणारी एक अल्पवयीन तरुणी शुक्रवारी डोंबिवलीला लागून असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात आपल्या एका मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी दोघे जण त्याठिकाणी आले. त्यांनी त्या तरुणी आणि तिच्या मित्राला आपण पोलीस असल्याचं सांगितले. इतकंच नाही तर तुम्ही इथे फिरताय? ही बाब तुमच्या पालकांना सांगत धमकवले. त्या दोघांना धमकवल्यानंतर त्या दोघांपैकी एक तरुण मुलीच्या मित्राला घेऊन स्टेशन परीसरात गेला. आमचे साहेब इथे बसले तू त्यांच्याशी बोल, अस सांगत त्याने तरुणाला गुंतून ठेवलं. दरम्यानच्या वेळात दुसरा आरोपी हा तरुणीला घेऊन काही अंतरावर गेला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. दुसरा आरोपीही मुलाला सोडून पुन्हा त्या ठिकाणी आला आणि त्यानेही मुलीवर अत्याचार केला.

पोलिसांनी नेमली पाच पथके -
पीडीत मुलीने सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.सुरवातीला रेल्वे पोलीसंकडे तक्रार करण्यात आली. मात्र नंतर हे प्रकरण शहर पोलिसांकडे येत असल्याने रात्री बारा वाजता विष्णूनगर पोलिसांकडे गेले. पोलिसांनी तपासासाठी पाच पथकं नेमली आहे. ठाकुर्ली खाडी किनारा, बावन चाळ परिसर निर्जन असल्याने तरुण तरूणीनी या ठिकाणी जाणं टाळावे, अशा भावना व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी बावन चाळ परीसरातही अशीच घटना घडली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad