मधुमेह, उच्चरक्तदाब तपासण्यासाठी डॉक्टर येणार घरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2023

मधुमेह, उच्चरक्तदाब तपासण्यासाठी डॉक्टर येणार घरी



मुंबई - बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाबाचे प्रमाण वाढते आहे. मुंबईकरांमधील वाढता ताणतणाव कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने येत्या सोमवारपासून घरोघरी तपासणी मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दहा हजार आशा वर्कर्स, नर्सेस आणि बीएमएस डॉक्टरच्या माध्यमातून तपासणी करणार आहेत. तपासणीत डायबेटिस, हायपरटेन्शन आढळणार्‍यांवर आवश्यक औषधोपचारही केले जाणार आहेत.

रोजची धावपळ, अवेळी खाणे, व्यायामाकडे दुर्लक्ष तसेच जंकफुडचे सेवन आदी कारणांमुळे सुमारे ३४ टक्के मुंबईकरांमध्ये उच्चरक्तदाब असल्याचे मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पालिकेने पाच हजार जणांमध्ये सर्वेक्षण केले होते. मुंबईकरांमध्ये ताणतणाव वाढत असल्याने पालिकेने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. सुरुवातील ‘आशा’ वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्राथमिक तपासणी केली जाईल. यावर ‘बीएमएस’ डॉक्टरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल. तर सर्वेक्षणात आढळणार्‍या संशयितांवर डॉक्टर, पालिकेचे दवाखाने आणि आवश्यकता भासल्यास मोठ्या रुग्णालयांच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आशा वर्कर्सना प्राथमिक तपासण्यांसाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईत ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची तपासणी यामध्ये केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

२५ लाख मुंबईकरांची होणार तपासणी -
या उपक्रमात २५ लाख मुंबईकरांची तपासणी केली जाणार आहे. दहा हजार आशा वर्कर्स घरोघरी जाऊन ज्येष्ठ, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती घेतील. यात ज्येष्ठ, गरोदर स्त्रियांना गरजेनुसार आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. पालिकेकडे सद्यस्थितीत ४५०० ‘आशा’ वर्कर्स कार्यरत आहेत. यामध्ये आणखी ५५०० ‘आशा’ वर्कर्सची भरती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad