मुंबई - राज्यभरातील निवासी डॉक्टर सोमपासून आपल्या विविध मागण्यासाठी संपावर गेले होते. काल दुसऱ्या दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी पालिका आयुक्तांना भेटावे असे महाजन यांनी सांगितले होते. आज पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी कोविड भत्याचा प्रश्न मार्गी लावला असल्याची माहिती मार्डच्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान पुढील मागण्यांसाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असेही डॉक्टरांनी सांगितले.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांची पदनिर्मिती, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरावीत, महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तात्काळ द्यावी. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी मार्डने सोमवार २ जानेवारीपासून संप पुकारला होता. या संपात महापालिकेच्या २ हजार निवासी डॉक्टरांसह राज्यातील एकूण ७ हजार निवासी संपात सहभागी झाले होते.
कोविड भत्याचा प्रश्न मार्गी -
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत ३ जावरील झालेल्या बैठकीदरम्यान पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा कोविड भत्ता, महागाई भत्ता तसेच वस्तीगृहाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर आज पालिका आयुक्तांची भेट घेण्याचे डॉक्टरांना सांगण्यात आले होते. त्यानुसार आज आयुक्तांची भेट घेतली असता कोविड भत्त्याची फाईल मंजूर करण्यात आली आहे. इतर प्रश्नाबाबत डॉ. संजीव कुमार यांच्याशी चर्चा करण्याचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले. आयुक्तांनी सांगितल्या नुसार संजीवकुमार यांची भेट घेतली असून वेळ पडल्यास आम्ही मंत्री गिरीश महाजन यांना भेटून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
No comments:
Post a Comment