आम आदमी पार्टीचे 'मोदी हटाओ, देश बचाओ' आंदोलन सुरु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2023

आम आदमी पार्टीचे 'मोदी हटाओ, देश बचाओ' आंदोलन सुरु


मुंबई - ब्रिटिश काळातील कायदे जनतेवर पुन्हा एकदा लादून मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. जर आता आपण या जुलूमशाहीच्या विरोधात उभे नाही राहिलो नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. यासाठी देशभरात 'मोदी हटाओ, देश बचाओ'चे आंदोलन उभारले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई व महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणी आम आदमी पार्टी 'मोदी हटाओ, देश बचाओ' चे पोस्टर्स लावणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी दिली. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यवीर शाहिदांनी हसत हसत आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले. ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र होईल, निरक्षरता दूर होईल, भारत एक सुशिक्षित राष्ट्र होईल, देशातील लोक उपचारासाठी भटकणार नाहीत, तरुणांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल, असे त्यांचे स्वप्न होते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. इंग्रजांचे राज्य असताना, त्या वेळी कोणीही पत्रक वाटू शकत नव्हते, वर्तमानपत्र काढू शकत नव्हते.  भारताच्या स्वातंत्र्याच्या वीरांचा आवाज चिरडण्यासाठी असे कायदे त्या वेळेस ब्रिटिशांनी केले होते. आज पुन्हा त्या कायद्यांचा आधार घेऊन देशाचा आवाज चिरडला जात आहे. आज मोदी सरकारच्या जुलूमशाही राजवटीच्या विरोधात संपूर्ण देशाने उभे राहण्याची वेळ आलेली आहे. आज जर आपण उभे राहिलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत, असे वक्तव्य आम आदमी पार्टीच्या मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केले. 

आम आदमी पार्टी कडून मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर 'मोदी हटाओ, देश बचाओ' आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मुंबई व महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक ठिकाणी 'आम आदमी पार्टी' कडून मोदी हटाव देश बचाओचे पोस्टर्स लावले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेत प्रीती शर्मा मेनन यांच्या सोबत, आम आदमी पार्टी महाराष्ट्र चे उपाध्यक्ष धनराज वंजारी, आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस व द्विजेंद्र तिवारी, आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे, मुंबई उपाध्यक्ष पायस व्हर्गीस उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर 'मोदी हटाओ, देश बचाओ' चे पोस्टर्स लावले. जे नंतर पोलिसांनी काढले.  

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनराज वंजारी यावेळेस म्हणाले की, दिल्लीमध्ये जेव्हा आम आदमी पार्टीने ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ची पोस्टर्स लावण्यात आली, त्यावेळेस मोदी सरकार पूर्णपणे हादरून गेले. आम आदमी पार्टी विरोधात दिल्लीमध्ये 138 एफआयआर दाखल करण्यात आल्या. देशाच्या इतिहासात, अगदी ब्रिटीश राजवटीत सुद्धा एका पोस्टर आणि एका पॅम्प्लेटसाठी 138 एफआयआर कधीच झाल्या नव्हत्या. आजपासून आम आदमी पार्टी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’चे पोस्टर लावणार आहे.  एफआयआर, पोलिस आणि तुमच्या तुरुंगामध्ये किती ताकद आहे ते आम्हाला पण बघायचे आहे.  जेव्हा सगळीकडे “मोदी हटाओ, देश बचाओ” चे पोस्टर्स लावले जातील, तेव्हा तुरुंग भरतील. तुरुंगामध्ये जागा उरणार नाही. पण भारत मातेला वाचवण्यासाठी छाती आणि हात कमी पडणार नाहीत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad