जातीनिहाय जनगणना करा - काँग्रेसची मोदींकडे मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2023

जातीनिहाय जनगणना करा - काँग्रेसची मोदींकडे मागणी


मुंबई - कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. यंदाच्या जनगणनेत जातीनिहाय गणनेला प्राधान्य द्यावे ज्यामुळे खास करून ओबीसींच्या कल्याणाला गती देता येईल असे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. त्याचबरोबर २०११ च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारीही सार्वजनिक करावी अशीही मागणी खरगे यांनी केली आहे.

विरोधी पक्षातील नेते गेल्या काही दिवसांपासून जनगणनेत जातीनिहाय गणनेची मागणी करत आहे. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील पतप्रधानांना पत्र लिहित मागणी केली आहे. रविवारी राहुल गांधींनी देखील पंतप्रधान मोदींना २०११ च्या जाती आधारित जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक डोमेनमध्ये जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.

यूपीए काळातील जनगणना जाहीर करा - 
मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात दावा केला की, सन २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर, काँग्रेस आणि इतर खासदारांनी २०११-१२ मध्ये यूपीए सरकारच्या काळात झालेल्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली होती.

अद्यावत जात जनगणना करा - 
पंतप्रधान मोदींना सर्वसमावेशक अद्यावत जात जनगणना करण्याचे आवाहन केले आहे. जनगणना करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असून ती लवकरात लवकर व्हावी अशी आमची मागणी असल्याचे खरगे म्हणाले. तसेच काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवण्याची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad