कोरोना नियंत्रण यंत्रणा सक्षम करा, केंद्राचे ८ राज्यांना पत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 April 2023

कोरोना नियंत्रण यंत्रणा सक्षम करा, केंद्राचे ८ राज्यांना पत्र

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ८ राज्यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही, कोरोना नियंत्रण यंत्रणा सक्षम करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि नवी दिल्ली या राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी हे पत्र पाठविले.

केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी ८ राज्यांनी कोरोना सनियंत्रण यंत्रणा सर्व जिल्ह्यांत सक्षम करावी आणि कोरोनासंदर्भात समाज जागृतीचे काम करावे, असे म्हटले आहे. भारतात मार्च २०२३ पासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. २० एप्रिलला संपलेल्या आठवड्यात १०२६० कोरोना रुग्ण आढळून आले होते. भारताचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य सचिवांनी कोरोना संसर्ग संपलेला नाही. आपण महामारी व्यवस्थापनासाठी सतर्क असले पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी नियमितपणे अद्ययावत करण्यात यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. रुग्ण वाढणा-या ठिकाणी चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. ताप, सारी याचे नियंत्रण करण्यात यावे, असे सांगण्यात आले. कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्यास नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, भारतात कोरोना संसर्ग झाल्याने ५ लाख ३१ हजार २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad