सावरकरांसाठी सावित्रीबाई अहिल्यादेवींचे पुतळे हटवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2023

सावरकरांसाठी सावित्रीबाई अहिल्यादेवींचे पुतळे हटवले


नवी दिल्ली - वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकरांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आले होते. तसे फोटो प्रसिद्ध झाले असून तसा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (Statues of Savitribai Ahilya Devi removed for Savarkar)


रोहित पवार ट्विटरवर म्हणाले की, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. ते म्हणाले, हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकारचा भीम आर्मी या संघटनेनेही निषेध केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad