परीक्षेच्या मूल्यांकनात सहभागी न होणारे कॉलेज व प्राध्यापकांवर कारवाई, विद्यापीठाचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2023

परीक्षेच्या मूल्यांकनात सहभागी न होणारे कॉलेज व प्राध्यापकांवर कारवाई, विद्यापीठाचा निर्णय


मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या असे निदर्शनास आले आहे की काही महाविद्यालये व विविध महाविद्यालयातील प्राध्यापक हे परीक्षेच्या मूल्यांकनात सहभागी होत नाहीत, यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब होतो म्हणून अशा महाविद्यालयावर व मूल्यांकन न करणाऱ्या प्राध्यापकावर विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार एखाद्या परीक्षेचा निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर करणे आवश्यक आहे,  जास्तीत जास्त ४५ दिवसाच्या आत निकाल जाहीर करणे आवश्यक आहे. परंतु वेळेत मूल्यांकन न झाल्याने विद्यापीठाला निर्धारित वेळेत परीक्षेचा निकाल जाहीर करणे शक्य होत नाही यामुळे निकालास विलंब होतो.

निकाल विलंबाच्या कारणाचा विद्यापीठाने शोध घेतला असता काही महाविद्यालये व प्राध्यापक मूल्यांकनात सहभागीच होत नाहीत असे दिसून आले.  विद्यापीठाने त्या महाविद्यालयास व त्या प्राध्यापकांना वारंवार सूचना देऊनही  मूल्यांकनाच्या बाबतीत ही महाविद्यालये व प्राध्यापक विद्यापीठाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम निकाल विलंबाने जाहीर होण्यावर होतो. महाविद्यालयाने व प्राध्यापकांनी मूल्यांकन करणे हे कायद्यानुसार बंधनकारक आहे. म्हणूनच अशा महाविद्यालयावर व प्राध्यापकावर महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. लवकरच अशा महाविद्यालयांना व प्राध्यापकांना पत्र पाठवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad