आपला दवाखानाचे आतापर्यंत ९ लाख लाभार्थी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2023

आपला दवाखानाचे आतापर्यंत ९ लाख लाभार्थी


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेल्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत लाभार्थींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील दवाखान्यात विविध आरोग्याच्या सेवा सुविधा घेणाऱ्या एक लाख लाभार्थींचा सरासरी दर आता पंधरवड्यावर आला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दवाखान्यांच्या संख्येत भर पडतानाच प्रत्येक एक लाख लाभार्थींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. एकूण १५९ दवाखान्यांच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या आता ९ लाखांवर पोहचली आहे. 

हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. सुरूवातीच्या महिन्यात सरासरी लाभार्थींच्या वाढीच्या संख्येने आता वेग घेतला आहे. सुरूवातीच्या काळात म्हणजे नोव्हेंबर २०२२ मध्ये असणारा २ महिने ७ दिवस इतक्या एक लाख लाभार्थींची संख्या गाठण्याचा वेळ आता १५ दिवसांवर आला आहे. त्यासोबतच दवाखान्यांच्या संख्येतही वेगाने भर पडलेली आहे. अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत १५९ पर्यंत दवाखान्यांची संख्या पोहचली आहे.    

मुंबईतील दवाखान्यांची वाढती संख्या ही नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते आहे. मुंबईत २०० पर्यंत दवाखान्यांची संख्या गाठण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, मुंबईतील दिवसेंदिवस वाढणाऱ्या दवाखान्यांची उपलब्धतता ही नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत करणारी आहे. मुंबईतील नागरिकांना आजार आणि सहव्याधींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठीचा आपला दवाखाना हा उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले.   

आपला दवाखान्यात आतापर्यंत ९ लाख ३ हजार ५४५ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. या पैकी पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे ३७,३७४ रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचा रोग तज्ज्ञ अशा विविध उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे. तर हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने येथे ८,६६,१७१ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार याचा लाभ घेतला आहे.

प्रति एक लाख लाभार्थींची महिन्यानुसार आकडेवारी व दवाखान्यांची संख्या -
🔹१ लाख लाभार्थी-  ५२ दवाखाने/ २ महिने ७ दिवस  
🔹२ लाख लाभार्थी- ६४ दवाखाने/ १ महिना ७ दिवस  
🔹३ लाख लाभार्थी- १०६ दवाखाने/ २६ दिवस 
🔹४ लाख लाभार्थी- १०७ दवाखाने/ १९ दिवस
🔹५ लाख लाभार्थी- १०७ दवाखाने/ १२ दिवस 
🔹६ लाख लाभार्थी- १०७ दवाखाने/ २१ दिवस 
🔹७ लाख लाभार्थी- १५१ दवाखाने/ २१ दिवस
🔹८ लाख लाभार्थी- १५६ दवाखाने/ १७ दिवस 
🔹९ लाख लाभार्थी- १५९ दवाखाने/ १६ दिवस

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad