Mumbai News - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2023

Mumbai News - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार


मुंबई - मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालु लोकल ट्रेन मधील महिला डब्ब्यात आरोपीने तरुणीवर अत्याचार केला आहे. पीडित तरुणी परीक्षेला जात असतानाच तिच्यासोबत ही घटना घडली. याप्रकरणी नवाज करीम (वय 40 वर्षे) या आरोपीला आठ तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी पोलिसांनी दिली.

हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असून बेलापूरला परीक्षेसाठी जात होती. परीक्षेला जाण्यासाठी तिने सीएसएमटी-पनवेल लोकल पकडली. ट्रेनमधील सेकंड क्लास डब्याने ती प्रवास करत होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी डब्ब्यात चढला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर पळ काढला.

दरम्यान तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्राँच आणि मुंबई पोलिसांनी पथकं तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवुन घटनेनंतर आठ तासात बेड्या ठोकल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad