Thane News - उल्हासनगरमध्ये भाजप शिंदे गटात बॅनर वॉर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2023

Thane News - उल्हासनगरमध्ये भाजप शिंदे गटात बॅनर वॉर


मुंबई / ठाणे - ठाणे जिल्ह्यात भाजप शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू असून उल्हासनगर मध्येही याचे लोण पहायला मिळत आहे. उल्हासनगर मध्ये शिंदे गटाने "कमजोर लोग शिकायत करते है" अशा आशयाचे बॅनर लावत भाजपला डिवचले होते.

त्यावर भाजपने "50 कुठं आणि 105 कुठं? हा भाजपचा मोठेपणा" असे बॅनर लावत सेनेच्या वर्मी घाव घातल्याने उल्हासनगर मध्ये शिंदे गट भाजप मध्ये बॅनर वॉर दिसून आला. भाजपचा हा बॅनर रातोरात लागला आणि चोरीला देखील गेला. शिवसेनेने हा बॅनर चोरल्याची एकच चर्चा झाली. यानंतर अखेर मित्रपक्ष पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत वाद मिटवत दिवसभराच्या या नाट्यावर पडदा टाकला.
 
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मित्र पक्षातील वाद उफाळून आला आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप सक्रिय होताच शिंदे गट देखील शक्तिप्रदर्शन करू लागला.

सेनेच्या वर्चस्वामुळे तसेच मानपाडा येथे भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. आणि राजकीय नाट्याला सुरवात झाली. भाजप शिंदे गटातील हा वाद दिवा, कल्याण डोंबिवली नंतर आता उल्हासनगर मध्ये दिसून येत आहे.

कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ एक बॅनर लावला होता. या बॅनरवर 'कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है!' असा मजकूर छापण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad