Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सहा महिन्यात राज्यातील ४,४३४ मुली बेपत्ता


मुंबई - राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या हल्ल्यावरून आणि त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली असून राज्यात गेल्या सहा महिन्यात २४५८ मुली बेपत्ता आहेत आणि ही चिंतेची बाब असल्याचे शरद पवार म्हणाले. १४ जिल्ह्यातून एकून ४४३४ मुली बेपत्ता असल्याची माहितीही पवारांनी दिली. (In six months 4434 girls missing in the state)

शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारला एक वर्ष झाले, अनेक प्रश्न समोर आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. महिला आणि मुली यांच्यावर हल्ले होतायंत आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतेय ही चिंतेची बाब आहे. पुणे, ठाणे, सोलापूर आणि मुंबई मधील महापालिकेच्या क्षेत्रातली माहिती माझ्याकडे आहे. जानेवारी २०२३ पासून मुंबईतून ठाण्यातून ७२३ मुली, मुंबई ७२३ आणि सोलापूर ६७ हा असा एकूण जवळपास २४५८ मुली बेपत्ता आहेत.

इतर समाजाचे मत विचारात घ्या -
शरद पवार यांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावरुनही केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. एकाच देशात दोन कायदे नको असे पंतप्रधानांनी म्हटल्याची माहिती आहे. त्यावर समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे. शिख समाज, जैन आणि इतर समाजांची भूमिका काय आहे हे स्पष्ट व्हावे. शिख समाजाचं वेगळं मत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे.

महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न -
समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. कायदा आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वांचं मत लक्षात घेऊन यावर निर्णय घ्यावे. शरद पवार पुढे म्हणाले की, समान नागरी कायदा लागू करण्याची बातमी सगळीकडे पसरवली जातेय, हे कुठल्यातरी महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष विचलित करण्यासाठी केलं जातंय का हे पाहावं लागेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom