मुंबई - बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जाऊ नये, पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जुहू चौपाटीवर समुद्रात गेलेली १२ ते १५ वयाची ५ मुले बुडाली आहेत. त्यापैकी एकाला स्थानिकांनी वाचवले आहे तर ४ जणांचा शोध घेतला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (१२ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकोला, सांताक्रुझ येथील ५ मुले जुहू चौपाटीवर समुद्रात अर्धा किलोमिटरपर्यंत वाहून गेली. स्थानिक मच्छीमारांनी त्यापैकी एका मुलाला वाचवले. इतर ४ मुले मात्र वाहून गेली. या मुलांना शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यानंतरही या मुलांचा शोध न लागल्याने रात्री ८.२० वाजता नेव्हीची मदत घेण्यात आली. नेव्हीकडून या मुलांचा शोध घेतला जात आहे.
बेपत्ता मुलांची नावे -
जय ताजबरिया १५ वर्षे
मनीष ओगानिया १२ वर्षे
शुभम ओगानिया १५ वर्षे
धर्मेश फौजिया १६ वर्षे
No comments:
Post a Comment