Mumbai News - जुहू चौपाटीवर बुडून २ जणांचा मृत्यू, २ बेपत्ता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News - जुहू चौपाटीवर बुडून २ जणांचा मृत्यू, २ बेपत्ता

Share This

मुंबई - बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जाऊ नये, पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जुहू चौपाटीवर समुद्रात गेलेली १२ ते १५ वयाची ५ मुले सोमवारी सायंकाळी बुडाली. त्यापैकी एकाला स्थानिकांनी वाचवले आहे. २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. 

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (१२ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकोला, सांताक्रुझ येथील ५ मुले जुहू चौपाटीवर समुद्रात अर्धा किलोमिटरपर्यंत वाहून गेली.   स्थानिक मच्छीमारांनी त्यापैकी एका मुलाला सुखरूप वाचवले. इतर ४ मुले समुद्रात बुडाली. या मुलांना शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यानंतरही या मुलांचा शोध न लागल्याने रात्री ८.२० वाजता नेव्हीची मदत घेण्यात आली. नेव्हीकडून या मुलांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान शुभम ओगानिया १६ वर्षे आणि धर्मेश फौजिया १६ वर्षे या दोघांचा मृतदेह पोलिसांना मिळाला असून शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. इतर दोन मुले अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.  

बेपत्ता मुलांची नावे - 
जय ताजबरिया १५ वर्षे
मनीष ओगानिया १२ वर्षे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages