एसटीचा "अमृतमहोत्सवी" वर्धापन दिन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा होणार ...! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 June 2023

एसटीचा "अमृतमहोत्सवी" वर्धापन दिन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा होणार ...!


मुंबई - खेड्यापाड्यात जाणाऱ्या लालापरीचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी सर्व एसटी प्रेमीनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शेखर चन्ने यांनी केली आहे. ("Amritamahotsavi" anniversary of ST)

१ जून १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्ताने एसटीच्या "अमृतमहोत्सवी" वर्धापन दिन सोहळा ३ जून रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित केला जाणार होता. परंतू ओरिसा येथील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम करणे उचित होणार नाही, या कारणास्तव मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या सुचनेनुसार सदर कार्यक्रम स्थगित करण्यात आला. आत हा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे दिनांक १४ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून, प्रमुख पाहूणे म्हणुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, एसटीचे सदिच्छा राजदूत जेष्ठ नेते मकरंद अनासपूरे हे देखिल उपस्थित राहणार आहेत. 

या सोहळयाच्या निमित्ताने -
१] एसटीच्या कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. 
२] २५ वर्षापेक्षा जास्त सुरक्षित सेवा बजावणा-या ५ चालकांचा सपत्निक सत्कार होणार आहे. 
३] तसेच कोरोना महामारी नंतर गेल्या वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणा-या राज्यातील पहिल्या तीन विभांगाचा व २५० आगारापैकी गटनिहाय ९ आगारांचा सत्कार होणार आहे. 
 ४] याबरोबरच दुरदर्शी प्रणालिव्दारे राज्यातील विविध बसस्थानकांचे भुमिपुजन, उद्घाटन आणि  बसस्थानक परिसराचे कॉक्रिटिकरण या कामाचा शुभारंभ होणार आहे.
५] विशेष म्हणजे एसटीच्या ७५ वर्षाचा इतिहास सांगणा-या "एसटी विश्वरथ" या वातानुकुलित फिरत्या बसचे उद्घाटन देखिल या वेळी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad