मुंबई - काल 26 जून रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याला एच पूर्व कार्यालयात मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे (UBT) आमदार अनिल परब आणि अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला झालेल्या पालिका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा वाकोला पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार अनिल परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, माजी नगरसेवक सदा परब, शाखा प्रमुख सतोष कदम आणि शाखा प्रमुख उदय दळवी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काल (26 जून) रोजी उशिरा वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवकाला अटक केली हाजी हलीम खान यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली काल सोमवारी वांद्रे पूर्व येथील एच पूर्व कार्यालयावर पाणी आणि इतर नागरी समस्यांबाबत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनिल परब यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करताना वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखा पाडण्याबाबत पालिका अधिकाऱ्याला जाब विचारला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सबंधित अधिकाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबधित अधिकारी पालिकेत सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहे.
No comments:
Post a Comment