मुंबई - पन्नास खोके, एकदम ओके... पन्नास खोके खाऊन माजलेत बोके...खोके सरकार हाय हाय,गद्दारांना इथे जागा नाय... महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार... अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने आज गद्दारांच्या विरोधात आंदोलन केले.
आज 'गद्दार दिवस' म्हणून साजरा करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी भवनच्या बाहेर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हातभार लावणार्या चाळीस गद्दारांच्या विरोधात हे जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सहभाग नोंदवला. याशिवाय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान पोलीसांनी प्रदेश कार्यालयात येणाऱ्या युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना अगोदरच ताब्यात घेऊन आंदोलन करण्यापासून रोखले त्यावेळी महेबूब शेख यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
No comments:
Post a Comment